नमस्कार मित्रानो मी मुळचा अलिबागचा. दोन बहिणी, दोन भाऊ, आई व वडील अशा कुटुंबातले शेंडेफळ. आई Government Servant वडील शिक्षक व चारही मोठी भावंडे उच्चशिक्षित व आपल्या नोकरी व्यवसायात स्थिरस्थावर झालेले असे माझे कुटुंबीय. मला लहानपणापासूनच कलेची आवड होती व Commercial Artist व्हावे असे माझे स्वप्न होते. पण आई वडिलांच्या आग्रहास्तव मी सायन्स साईड घेतली व बी.एस.सी. (Bachelor of Computer Science) ला प्रवेश घेतला. ह्या शाखेतील अभ्यासक्रम हा कॉम्पुटर कोडींग, प्रोग्रामिंग या विषयाशी निगडीत असल्याने माझे यात मन रमत नव्हते. फोटोग्राफीची आवड असलेला माझ्यातला कलाकार मला स्वस्थ बसून देत नव्हता. अशातच कॉलेजमध्ये शेवटचे वर्ष संपत आलेले असताना अपर्णा राणे या माझ्या मैत्रिणीने मला वेब डिझायनिंग मध्ये करिअर करण्याचा सल्ला दिला व तिच्या ओळखीने पुण्यात एडीट या संस्थेमध्ये मी २००६ साली वेब डिझायनिंगला प्रवेश घेतला. एडीटमध्ये कोर्स करत |
असताना इतके दिवस मनाविरुद्ध शिक्षण घेतल्याने मनाला आलेली मरगळ दूर झाली व शेवटी आवडीचे क्षेत्र मिळाल्याने व एडीटच्या मनमोकळ्या वातावरणामुळे मी हा कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण करू शकलो. त्यानंतर लगेचच मे २००७मध्ये मला एडीटतर्फे ट्रेनी वेब डिझायनर म्हणून नोकरी लागली. ४०००/- ने सुरुवात करून लगेच ३ महिन्यात ८०००/- व साडे तीन वर्षात ३३०००/- पगारावर मी पोहोचलो आहे. ट्रेनी वेब डिझायनर म्हणून सुरु झालेला माझा प्रवास आता "आयक्रेव्ह" या कंपनीमध्ये Design Dept. Head या पदावर येऊन पोहोचला आहे. या साडेतीन वर्षात माझी वैयक्तिक पातळीवरदेखील खूप प्रगती झालेली आहे. आधी बाईक व आता Nissan Micra ही नवीन कार मी घेतलेली आहे. माझी प्रगती बघून माझे कुटुंबिय जसे की पत्नी, भावंडे व सुरुवातीला साशंक असलेले माझे आईवडिलदेखील खूप खुश आहेत. लवकरच भविष्यात नवीन घर घेण्याचा माझा विचार आहे. माझी स्वप्ने पूर्ण होत असतानाच माझ्या जीवनाला मिळालेली कलाटणी मी कधीच विसरू शकणार नाही. याबद्दल एडीटचे खूप आभार. |
![]() |
Mumbai :
|
Pune :Pravin Pawar : 9762137240 |
Check our current Placements:www.edit.co.in/placement.html |
|
Mumbai :Opera house : 23857794, Dadar (W) : 24327715, Andheri (W) : 26250039
|