नमस्कार मित्रांनो , माझे नाव पंकज पटेल आहे. मी नाशिक जवळील मालेगाव जिल्ह्यातला. माझ्या घरी मी, माझी पत्नी , आई, वडील व १ लग्न झालेली बहिण असा परिवार आहे.मी मुळचा गुजराथी आहे.माझ्या वडिलांचा मालेगावला hardware चा व्यवसाय आहे. माझ्या वडिलांची इच्छा होती कि, मी B.com करीत असतानाच एखादा hardware & networking चा कोर्स करावा व त्यांचा व्यवसाय सांभाळावा. पण मला मात्र या छोट्या शहरात राहण्याचा कंटाळा आला होता. माझा मित्र स्वप्नील सोनावणे याने मला पुण्याच्या EDIT Institute मध्ये Diploma in new Multimedia करण्याचा सल्ला दिला. तो सुद्धा तोच कोर्स करीत होता. माझे Drawing खूप चांगले होते म्हणून मी या कोर्स ला जून २००५ ला admission घेतली. कोर्स करत असताना माझ्या faculty ने सांगितले कि मी Flash या software मध्ये खूप चांगले काम करतो. त्यामुळे मी Multimedia ,e-learning या विषयात पुढे जावे. आजून १ गोष्ट म्हणजे एडीटतर्फे दर वर्षी बालगंधर्व कलादालनात विद्यार्थ्यांच्या कामाचे (Portfolio) प्रदर्शन होते. त्या exhibition ला अनेक मोठ्या कंपनी चे executive भेट देतात. व त्यांना आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड करतात. या प्रदर्शनाला " Expressions" आसे म्हणतात. |
या Expressions मध्ये आपले काम चांगले व्हावे म्हणून, मुले खूप मेहनत घेतात. मी पण हि मेहनत घेतली. यातूनच मला सुरवातीला कोर्स चालू असताना Artmosphere या छोट्या कंपनी मध्ये 2D Artist & Multimedia Designer म्हणून नोकरी मिळाली. तिथे मिळणारा पगार खूप कमी होता पण मला खूप शिकायला मिळाल व माझा आत्मविश्वास वाढला. पुढे Avion Technology, Yardi Infotech आशा मोठ्या कंपनी मध्ये कामाचा अनुभव घेत गेलो व सुरवातीला २५०० रुपये महिना पगाराने ने सुरु केलेली नोकरी, पुढे २०१० साली synechron या मोठ्या नावाजलेल्या कंपनी मध्ये sr. Associate- Design Department या पदावर ४०,००० रुपये महिना या पदावर येऊन पोहोचली. मालेगाव सारख्या छोट्या शहरातून आलेल्या मला कंपनी ने माझे काम व मेहनत बघून On site Project Basis वर ४ महिन्यासाठी दुबईला पाठवले. आज माझीही प्रगती बघताना माझ्या सर्व कुटुंबाबरोबरच माझ्या वडिलांना खूप जास्त आनंद होतो व मी वेळेत घेतलेल्या निर्णयाचे ते खूप कौतुक करतात. माझ्या या यशाचे श्रेय मी एडीटला देऊ इच्छितो. तुमची इच्छाशक्ती,मेहनत आणि एडीटची साथ या ३ गोष्टी तुम्हाला माझ्यासारखी परदेशवारी करण्यासाठी नक्कीच कामी येतील. |
![]() |
Mumbai :
|
Pune :Pravin Pawar : 9762137240 |
Check our current Placements:www.edit.co.in/placement.html |
|
Mumbai :Opera house : 23857794, Dadar (W) : 24327715, Andheri (W) : 26250039
|