मी राहुल क्षीरसागर, ठाणे उपनगरात एका मध्यवर्गीय कुटुंबात रहाणारा आणि पदवीपर्यंत शिक्षण घेणे या सोप्या सरळ विचार प्रवाहातील मी. पण हळूहळू जाणीव झाली की आता फक्त पदवीधर असणे म्हणजे करिअर नाही. नोकरीही मिळणे कठीण आहे. त्यासाठी अंगी काहीतरी कौशल्य असले पाहिजे. या विचारात असतानाच नेमकी मटामधील एडिटची जाहिरात माझ्या नजरेस पडली. या जाहिरातीवरून कळले की डिझाईन क्षेत्रात करिअरला खूप मोठा वाव आहे. करिअरच्या चांगल्या संधी या क्षेत्रात उपलब्ध आहेत. आणि म्हणून मी एडिटमध्ये वेब डिझायनिंगचा कोर्स सुरू केला. अत्यंत तळमळीने शिकवणारे अनुभवी शिक्षक आणि इंडस्ट्री अनुरूप अभ्यासक्रम हे या कोर्सचे खरे वैशिष्ट्य. माझा कोर्स पूर्ण होताच तात्काळ मला एडिटकडून पहिली नोकरी मिळाली. ती पॅन्टलून रिटेल इंडिया लिमिटेड |
या कंपनीत वेब डिझायनर म्हणून. तेथे माझे वेतन होते 5000/- प्रतिमहा. या कंपनीत काही महिने काम केल्यावर या अनुभवाच्या जोरावर दुसरी नोकरी मिळाली. ती अग्रगण्य अशा पटनी आयगेट या मोठ्या कंपनीत वेब डिझायनर म्हणून. सध्या मी याच कंपनीत सिनिअर ऍनालिस्ट म्हणून दरमहा 25000/- या पगारावर कार्यरत आहे. एडीटच्या या कोर्समुळे मी माझे सुखाचे जीवन जगत आहे. एवढेच नव्हे तर आर्थिक चणचणीमुळे राहिलेले माझे छंद जोपासत आहे. फोटोग्राफीसारखा छंद जोपासण्यासाठी मी सध्या डिजिटल एस.एल.आर कॅमेरा स्वपैशातून खरेदी केला आहे. पूर्वी मी रस्त्याने जाणाऱ्या कार पहायचो, आता मी माझ्या स्वतःच्या कारमधून रस्ता पहातो. एवढी किमया, एवढे परिवर्तन झाले ते एडिटमुळे. |
![]() |
Mumbai :
|
Pune :Pravin Pawar : 9762137240 |
Check our current Placements:www.edit.co.in/placement.html |
|
Mumbai :Opera house : 23857794, Dadar (W) : 24327715, Andheri (W) : 26250039
|