नमस्कार मित्रांनो मी विपुल शिंदे,मुंबईतील विक्रोळी येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात रहाणारा. माझे वडील सेवानिवृत्त, आई गृहिणी, एक विवाहित बहिण व एक खाजगी कंपनीत नोकरी करणारा मोठा भाऊ आणि शिक्षण घेणारा मी असा छोटासा परिवार. आर्थिक परिस्थिती जेमतेमच. आपणही लवकरात लवकर काहीतरी करावे आणि कुटुंबाची जबाबदारी उचलावी ही जाणीव माझ्या मनात होतीच. कॉलेजचे शिक्षण सुरू असताना ही जाणीव अधिकच जोर धरीत होती. त्यावेळी मी मटामध्ये एडिटची वेब 2.0 कोर्सची जाहिरात वाचली. आणि यामध्ये आपणही काही करू शकतो असे. मनापासून वाटल्याने मी एडिटच्या दादर शाखेत गेलो. तेथे कोर्सबद्दल पूर्ण माहिती घेतली आणि मला माझे करिअर मी घडवू शकतो हा आत्मविश्वास मिळाला.मी या कोर्सला प्रवेश घेतला. |
नोकरी असूनही माझ्यामध्ये खूप आत्मविश्वासल होता. कारण एडिटमध्ये शिकवताना कोर्स पूर्ण करण्याच्या भावनेने न शिकवता विद्यार्थ्याचे करिअर घडलेच पाहिजे या आत्मियतेने शिकवले जाते. त्यानंतर लगेच तीन महिन्यात मला एडिटकडून दुसरी नोकरी मिळाली ती अग्रगण्य अशा मिड डे या इंग्रजी वर्तमानपत्रात. तेथे मी वेब डिझायनर म्हणून गेले दोन वर्ष कार्यरत आहे. हे क्षेत्र खूपच इंटरेस्टिंग आणि जबाबदारीचे आहे. आज मी दरमहा 12000/- रुपये वेतन घेत आहे. ज्या वेळी इतर मुले करिअर करण्याचा विचार सुरु करतात त्यावेळी म्हणजे वयाच्या बावीसाव्या वर्षी मी मिड डे सारख्या कपनीत नोकरी करून स्वतःच्या पायावर उभा आहे. माझ्या परिवाराची जबाबदारी समर्थपणे सांभाळीत आहे. आणि माझ्या जीवनातील स्वप्ने प्रत्यक्षात साकारीत आहे. आज माझ्या स्वकमाईच्या पल्सर गाडीवरून फिरताना जो आनंद होतो तो अवर्णनीय आहे. एवढ्या लहान वयात स्वतः बरोबरच माझ्या परिवाराचे जीवन समाधानी करण्याचे श्रेय मी देईन ते माझ्या अचूक वेळी घेतलेल्या निर्णयाला आणि माझे करिअर घडविणाऱ्या एडिट परिवाराला. |
![]() |
Mumbai :
|
Pune :Pravin Pawar : 9762137240 |
Check our current Placements:www.edit.co.in/placement.html |
|
Mumbai :Opera house : 23857794, Dadar (W) : 24327715, Andheri (W) : 26250039
|